महसूल दिनानिमित्त एरंडोल महाविद्यालयात महसूल विभागातर्फे विद्यार्थ्यांसोबत संवाद
प्रतिनिधी एरंडोल – येथील तहसील कार्यालयातर्फे महसूल सप्ताह कार्यक्रमांतर्गत आज दुसऱ्या दिवशी दि. २ ऑगष्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता डी. डी. एस. पी. कॉलेज एरंडोल येथील युवा विद्यार्थ्यांशी श्रीमती सुचिता चव्हाण, तहसिलदार एरंडोल यांनी संवाद साधून त्यांना महसूल विभागातंर्गत दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व योजनांची माहिती देवून ते भविष्यात आपणास कसे उपयोगी ठरु शकते याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याव्यतिरिक्त उपअधिक्षक भूमि अभिलेख व दुय्यम निबंधक एरंडोल यांनी देखील त्यांचे कडील विभागा मार्फत कोणकोणत्या सेवा दिल्या जातात याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी त्यांचे आधार कार्ड अद्ययावत करणेकामी सेवा पुरविण्यात आली.
तसेच दुपारी ४.०० वाजता मा. राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमांतर्गत आदिवासी बंधू भगिनींना महसुल विभागाकडून शिधापत्रिका, संजय गांधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजुरीचे आदेश, पोट खराब क्षेत्र वहीतीखाली आणलेले सातबारा उतारे, जातीचे दाखले, शासन आपल्या दारी या उपक्रमाव्दारे घरपोच पैसे वाटप चे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर मा. विभागीय आयुक्त यांनी आदिवासी युवकांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या विविध सेवाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास आयुष प्रसाद जिल्हाधिकारी , अंकीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव , अर्पित चव्हाण सहाय्यक जिल्हाधिकारी , प्रविण महाजन अप्पर जिल्हाधिकरी, मनिषकुमार गायकवाड , सुचिता चव्हाण, तहसिलदार व महसुल विभागा चे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.