शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला “एक हात मदतीचा” …..
महसूल दिनानिमित्त तहसीलदार सुचिता चव्हाण यांचे मार्गदर्शन
प्रतिनिधी एरंडोल – महसूल सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी ३ ऑगष्ट २०२३ रोजी “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी मौजे भालगाव, मोजे टोळी व मौजे पिंप्री बु. ता. एरंडोल येथे शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला सात्वंनपर भेट देऊन त्यांचे कुटूंबाची विचारपुस करुन त्यांना शासकीय मदत मिळणेकामी मार्गदर्शन केले. तसेच दुपारी १२.०० वाजता मौजे भातखेडा ता. एरंडोल येथे किशोर माळी, निवासी नायब तहसिलदार, संदीप निळे पुरवठा निरीक्षक यांनी गरजु लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप करुन उपस्थितांना ई-पीक पाहणी व शासकीय योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. तसेच तालुक्यात तलाठी यांचे मार्फत ई-पीक पाहणी बाबत शिबीर आयोजित करुन शेतकऱ्यांच्या बांधावर जावून त्यांचे कडून ई-पीक पाहणी करुन नोंदणी करुन घेतली.