राहुल गांधी यांच्या शिक्षेस सुप्रिम कोर्टाने दिलेल्या स्थगिती बद्द्ल काँग्रेस पक्षाच्या वतीने जल्लोष
एरंडोल प्रतिनिधी – तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांच्या शिक्षेस सुप्रिम कोर्टाने दिलेल्या स्थगिती बद्द्ल फटाके आतिषबाजी व पेढे वाटुन जल्लोष करण्यात आला. दि. 04 ऑगष्ट 2023 रोजी सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेस स्थगिती देऊन संविधानाबाबत लोकांमध्ये विश्वास कायम ठेवला आहे तसेच राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण दिसून आले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला याप्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी विजय पंढरीनाथ महाजन , डॉ फरहाज हुसैन बोहरी , राजेन्द्र रामदास चौधरी , शेख कलीम हुसैन ,
प्रा आर एस पाटील , मदन भावसार , बबन वंजारी, अयाज मुजावर , जब्बार शेख , सैय्यद अंजुम , दीपक पाटील , सांडू दादा, कैलास मोरे , शेख जाकीर , मोहसीन शेख , सलिम शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.