पत्रकारास शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे निषेध..!
एरंडोल: पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांची स्थानिक पत्रकारास शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी येथील एरंडोल तालुका पत्रकार संघटनेतर्फे सोमवारी तहसीलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला तसेच गोंडगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली व खडके बु. येथील बालगृहातील कोवळ्या बालिकांचा लैंगिक छळ करण्यात आला या दोन्ही घटनांचा तीव्र धिक्कार करण्यात आला.
निवेदन देताना तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, प्रा.आर.एस.निकुंभ,चंद्रभान पाटील,शहराध्यक्ष कैलास महाजन,प्रविण महाजन,संजय बागड,कार्याध्यक्ष शैलेश चौधरी, तालुका सचिव पंकज महाजन आदी पत्रकार उपस्थित होते.