शिक्षण उपसंचालकांच्या त्या पत्राला शिक्षण विभागाचा “खो”
राष्ट्रीयकृत बँकेतून वेतन मिळावे यासाठी शिक्षकांवर आंदोलनाची वेळ.
प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच एक तारखेलाच शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार व्हावे ,नियमित वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्याची मागणी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या एक तारखेलाच राष्ट्रीयकृत बँकेत जमा होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अनेक वेळा निवेदन, तोंडी चर्चा तसेच आमदार सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या जळगाव येथील जनता दरबार मध्ये प्रश्न सोडविण्यासाठी वेतन अधीक्षक शर्मा साहेब यांना देखील सूचना केल्या होत्या.शिक्षण उपसंचालक, शिक्षण आयुक्त यांच्या बैठकीत सुद्धा हा प्रश्न संघटनेच्या वतीने मांडण्यात आला. या संदर्भात नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ.बी बी चव्हाण यांनी पत्र निर्गमित करून शिक्षणाधिकारी यांना राष्ट्रीयकृत बँकेत शिक्षकांचे पगार करावे,याबाबत कळविले होते. मात्र त्यावर अद्यापही कार्यालयाच्या वतीने पावली उचलल्या गेलेले नसल्याने शिक्षकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या वतीने दिनांक 9/ 8 /2023 रोजी जळगाव येथे शिक्षणअधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे.आंदोलनामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित अंशतः अनुदानित सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे. यासंदर्भाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी,मा. शिक्षण अधिकारी मा.वेतन अधीक्षक जळगाव, मा. आमदार सत्यजित तांबे,मा.आमदार किशोरजी दराडे ,मा. आमदार मंगेश चव्हाण यांना देण्यात आलेले आहे.
राष्ट्रीयकृत बँकेतून शिक्षकांना वेतन देण्यात यावे यासाठी खूप वर्षापासून लढा सुरू आहे शिक्षकांची मागणी रास्त आहे राष्ट्रीयकृत बँकेतून सवलती मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे शासनाने शिक्षकांचा प्रश्न सोडवावा नाही तर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल.अस इशारा संघटनाच्या वतीने देण्यात आला आहे.