विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त भिल समाज विकास मंच तर्फे रॅली
प्रतिनिधी एरंडोल – दि. ९ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला मणीपुर, गोंडगाव, खडके ह्या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ. मा राष्ट्रपती सो,व मा गृहमंत्री सो भारत सरकार याच्या कडे , मा तहसिलदार सो एरंडोल व मा पोलिस निरीक्षक सो एरंडोल यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आणि सालाबाद प्रमाणे निघणार्या मिरवणुकीचे रूपांतर अगदी साध्या रॅलीने करण्यात आली.
रॅलीची सुरूवात भगवान एकलव्य पुतळा केवडीपुरा , म्हसावद नाका , बुधवार दरवाजा , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , मेन रोड , भगवा चौक , मारवाडी गल्ली , अंमळनेर दरवाजा , नागोबा मढी , महात्मा फुले पुतळा , डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , मरी माता चौक,मार्ग केवडीपुरा येथे सांगता करण्यात आली.
रॅली शहरातून मार्गक्रमण करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास , महात्मा फुले पुतळ्यास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.
मणिपूर येथे आदिवासी महिलांची विवस्र धिंड काढणारे व खडके येथील अत्याचार , गोंडगाव ता भडगाव येथील चिमुकलीस अत्याचार करुन जिवेठार मारणार्या नराधमास मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी अन्यथा येणार्या काळात भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आम्ही कुटुंबासह संपुर्ण राज्य तालुका जिल्हा पातळीवर जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनाचा माध्यमातून देण्यात आला.
दिपक अहिरे (जिल्हाध्यक्ष), भैय्या मोरे (एरंडोल तालुकाध्यक्ष), सागर वाघ (जि.प्रमुख सोशल मिडीया), शंकर बोरसे (शहराध्यक्ष ), मोतीराम मालचे, निहाल सोनवणे, पंकज सोनवणे, खंडु बोरसे, ज्ञानेश्वर गायकवाड, शिवदास सोनवणे, माऊजी सोनवणे,मच्छिंद्र मोरे,राहुल मोरे,कैलास मालचे,जिजाताई सोनवणे,विष्णू मालचे,धनराज पवार,लखन वाघ,नानू बोरसे,दिपक सुर्यवंशी,भुषण मोरे,शालीक मोरे,किशोर गायकवाड, आदी हजारो च्या संख्येने पदधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.