पाटबंधारे विभागातील कर्मचारी वाय. बी. पाटील सेवानिवृत्त
एरंडोल – येथील पाटबंधारे विभागातील कर्मचारी वाय. बी. पाटील नुकतेच शासकीय वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा पाटबंधारे विभागातर्फे सेवानिवृत्तीचा सत्कार कार्यक़्रम संपन्न झाला.
वाय. बी. पाटील यांच्या सेवेची सुरुवात 16/08/1985 भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर येथे होवून पारोळा, एरंडोल, धरणगाव, येथे त्यांनी सेवा केली. ते सिंचन संघटनेत सन 1992 ते 1998 जिल्हा उपाध्यक्ष, 1998 ते 2000 पर्यंत तसेच 2001 ते 2017 पर्यंत जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी सर्व कर्मचारी यांच्या अडचणी सोडवणे तसेच वर्ग 4 उ.ठ. ढ. कर्मचारी ड.ड.उ पास यांना कालवा निरीक्षक /मोजणीदारपदी पदोन्नती करण्यासाठी प्रयत्न करून न्याय दिला.
कार्यक्रमाप्रसंगी स्थानी ड. ऊ. ज. एस. आर. पाटील, आर. आर. चौधरी रिटायर्ड हेड क्लर्क, गणेश पाटील वरिष्ठ लिपिक, नेहते, मराठे, प्रवीण पाटील, माळी मॅडम, वर्षा माळी, महाजन मॅडम, भागेश्वर कर्मचारी वृंद उपस्थित होते.