एरंडोल महाविद्यालयात निलॉन्स कंपनी शाखा उत्राणतर्फे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन
एरंडोल – येथील दादासाो. दि. शं. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग, वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा केंद्र आणि प्लेसमेंट सेल अंतर्गत निलॉन्स एंटरप्राइजेस प्रा. लि. तर्फे क्लार्क आणि केमिस्ट पदाच्या कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थाध्यक्ष अमितदादा पाटील, प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. ए. बडगुजर होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. ए. बडगुजर, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. एन. ए. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. निलॉन्स एंटरप्राइजेस प्रा. लि. शाखा उत्राणचे एच. आर. मॅनेजर राजेश घोरपडे तेजस आटोले कॉलिटी मॅनेजर, निलॉन्स निलॉन्स एंटरप्राइजेस प्रा. लि. शाखा उत्राण यांनी वाणिज्य आणि रसायनशास्त्र शाखेतील क्लार्क व केमिस्ट पदासाठी आलेल्या उमेदवारांचे त्यांनी मुलाखती घेतल्या. कार्यक्रमा यशस्वीतेसाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदीप कोतकर, स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. डॉ. बालाजी पवार, प्रा. डॉ. नितीन दांडेकर, प्रा. सुनील सजगणे, प्रा. योगेश ऐनडाईत, प्रा. योगेश पाटील, प्रा. जितेंद्र महाजन, प्रा. शेख मोमीन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन प्रा. विजय गाढे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. के. जे. वाघ, प्रा. राहुल पाटील यांचेसह मुलाखत देण्यासाठी आलेले इच्छुक उमेदवार उपस्थित होते.