पाचोरा येथील पत्रकार शिवीगाळ व मारहाणबाबत कासोदा पत्रकारांतर्फे निवेदन
प्रतिनिधी एरंडोल :- पाचोरा येथील ध्येय न्यूज चैनल चे संपादक व ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन यांना स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्याकडून झालेल्या असंविधानिक ,अर्वाच्य भाषेत केलेली शिवीगाळ व समर्थकांनी केलेली मारहाणबाबत कासोदा व परिसरातील पत्रकार बांधवांतर्फे निषेध नोंदवण्यात आला. कासोदा येथील पोलीस स्थानकात निषेध नोंदवून संबंधित हल्लेखोरांवर व शिवीगाळ धमकी प्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घ्यावी. पत्रकार महाजन यांच्या जीवितास व कुटुंबास धोका असल्याने विनामूल्य पोलीस संरक्षण देण्यात यावे. मारहाणीमुळे त्यांचे कुटुंब भयभीत झाले असून १५ ऑगस्ट रोजी त्यांनी कुटुंबासहित आत्महत्येचा इशारा दिला असून आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात यावी असे आशयाचे निवेदन कासोदा पत्रकारांतर्फे कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे उपनिरीक्षक गुंजाळ यांना 13 ऑगस्ट रोजी देण्यात आले. यावेळी कासोदयाचे ज्येष्ठ पत्रकार यु. टी.महाजन नुरुद्दिन मुल्लाजी जितेंद्र ठाकरे केदार सोमानी शालिग्राम पाटील (फरकांडे ) सुनील पाटील (तळई ) राहुल मराठे सागर शेलार प्रशांत सोनार गणेश मोरे शैलेंद्र पुरोहित आरिफ पेंटर फयोजोद्दीन शेख इमरान शेख उपस्थित होते.