तहसील कार्यालय एरंडोल येथे जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव.

images-5.jpeg

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक करतांना आढळून आलेली वाहने जप्त करुन पोलीस स्टेशन एरंडोल व कासोदा येथे जमा करण्यात जमा करण्यात आलेल्या आहेत. सदर वाहन मालक यांना अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे . परंतु संबंधित वाहन मालक यांनी अद्याप दंडाची रक्कम शासनास जमा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १७६ ते १८४ मधील तरतुदी नुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसूलाची थकबाकी समजून उक्त तरतुदीनुसार जप्त वाहनांचा लिलाव करुन लिलावातून प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करण्याची कार्यवाही नियोजित करण्यात आली आहे. यास्तव वाहन लिलावाबाबत कोणाची काही हरकत आहे किंवा नाही याबाबत हरकती मागविण्यात आल्या होत्या. परंतु सदर मुदतीत कोणाचीही हरकत प्राप्त झालेली नसल्याने दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता एरंडोल तहसिल कार्यालय येथे वाहनांचा लिलाव करण्यात येणार असून वाहनांच्या लिलावात सहभाग होण्याकामी तहसिलदार एरंडोल यांचेकडून दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी वाहन लिलावाची उद्घोषणा प्रसिध्द करण्यात येवून ती मा.उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, तहसिलदार, एरंडोल व तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यात वाहन लिलावाच्या बाबतीत सविस्तरपणे सर्व अटी शर्ती नमुद करण्यात आलेल्या आहेत. तरी इच्छुकांनी वाहन लिलाव प्रक्रियेमध्ये सह भाग घ्यावा असे आवाहन तहसिलदार सुचिता चव्हाण यांचा तर्फे करण्यात आले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!