एरंडोल पंचायत समिती कार्यालयासमोर संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने.
प्रतिनिधी – बिलोली तालुक्यातील संगणक परिचालक आत्महत्या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्यासाठी एरंडोल पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शन करण्यात आले.
ग्रामपंचायत हिप्परगाथडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील अंबादास नागोराव पेटेकर यांनी csc -spv कंपनीने नाहक दिलेले टार्गेट,कामा व्यतिरिक्त लावण्यात येणारे इत्तर कामे,तसेच ग्रामपंचायत स्तरावर कामावरुन कमी करण्याच्या दिलेल्या धमक्या,राज्य शासन संगणकपरिचालकांचा निर्णय घेण्यास करत असलेली टाळाटाळ या सर्व प्रकारामुळे होणारा मानसिक त्रास व दबावामुळे ०९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १० च्या सुमारास हिप्परगाथडी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या सर्व दोषीवर गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी राज्यातील सर्व पंचायत समितीसह एरंडोल पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता काळ्या फिती लावून महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या वतीने निदर्शने करणार आली.तत्पूर्वी संगणक परिचालक संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक व गटविकास अधिकारी दादाजी जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळी संगणक परिचालक संघटनेचे जिल्हा सचिव तथा तालुका अध्यक्ष रामचंद्र पाटील,तालुका सचिव महेंद्र पाटील, उपाध्यक्ष संतोष चौधरी, सदस्य दिनेश पाटील, गजानन पाटील, सचिन निकम, सोपान पवार, गजानन माळी,प्रीती कुलकर्णी, राजश्री धर्माधिकारी, दिक्षा पवार, प्रशांत पाटील, पुरषोत्तम पाटील, प्रभाकर पाटील, नवल वंजारी, विशाल पाटील,पंकज महाजन, संदीप बडगुजर, जगदीश पाटील,किशोर महाजन,नंदलाल वानखेडे, वाल्मिक पाटील, दीपक चौधरी आदी उपस्थित होते. कोणत्याही संगणकपरिचालकाने आत्महत्ये सारखा चुकीचा निर्णय न घेण्याचे संघटनेकडून आवाहन !
सर्व संगणकपरिचालकाना नम्र विनंती आहे कुणाच्याही दबावाला बळी पडू नका,कुणी काढून टाकण्याची धमकी देत असेल,कोणी अन्य प्रकारचा दबाव टाकून मानसिक त्रास देत असेल तर तालुका,जिल्हा किंवा राज्य संघटनेला माहिती द्यावी नक्कीच त्यातून मार्ग काढला जाईल,जीवन महत्वाचे व मौल्यवान असून आपल्या कुटुंबाचा व स्वतःचा विचार करून तरी असा चुकीचा निर्णय कोणीही घेऊ नये असे आवाहन राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी केले आहे.