देव तारी त्याला कोण मारी. भर रस्त्यावर पडली; 3 वाहनं अंगावरुन गेली अन्.., घडलं धक्कादायक, Video
नवी दिल्लीत : भर रस्त्यावर चालताना नेहमीच खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण थोडंही दुर्लक्ष झालं तर कोण, कधी अपघाताचा बळी ठरेल, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेकदा लोक काही कारणास्तव मुलांना हायवेच्या कडेला उभा करतात आणि पालकांची नजर चुकवून मुलं खोडकरपणे रस्त्याकडे धावू लागतात.
पण हे किती धोकादायक ठरू शकतं, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सध्या हेच दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक मुलगी धावत धावत रस्त्यावर पोहोचते आणि इथे तिचा अतिशय भीषण अपघात होतो.या अपघातानंतर जे काही होतं, ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल ‘देव तारी त्याला कोण मारी’. नुकताच असाच एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका लहान मुलीचा रस्त्यावर भयानक अपघात झाल्याचं दिसतं. पण तिचं नशीब चांगलं की, 3 वाहनं अंगावरून जाऊनही तिला काहीच होत नाही आणि ती वाचली.
पण ते कसं घडलं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मुलगी हायवेच्या दिशेने पळताना दिसत आहे. अचानक भरधाव वेगाने येणारी बाईक तिच्या अंगावरुन गेली, त्यामुळे ती खाली पडली. त्यानंतर दुसरी दुचाकी आणि तिसरी दुचाकीही तिच्या अंगावरुन गेली. तेवढ्यात तिची आई धावत येते आणि तिला आपल्या मिठीत घेतले.