लोण प्र.उ. येथे सोमवारी मिशन लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान
प्रतिनिधी – नेहरू युवा केंद्र जळगाव (भडगाव ब्लॉक)आणि प्रयास युथ फोरम एंड सोशल अवेअरनेस फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने लोण प्र.उ. येथे सोमवारी (दि२१) मिशन लाईफ या कार्यक्रमा अंतर्गत लोकसहभागातून श्रमदान मोहिमेअंतर्गत ‘वनराई बंधारा’ बांधण्यात आला. यावेळी पाणी अडवा, पाणी जिरवा चा संदेश देण्यात आला
याप्रसंगी माजी आमदार सतिष भास्करराव पाटील, नगरसेविका योजनाताई डी. पाटील, पिपल्स बँकेचे संचालक डी. डी. पाटील सर, माजी. सरपंच रावसाहेब पाटील,ग्रामसेविका जागृती बोरसे मॅडम, अॅड.विजय पाटील कृषी सहाय्यक वैशाली पाटील मॅडम, रामचंद्र चव्हाण, मनोज पाटील, साहेबराव पाटील, योगेश पाटील, दादाभाऊ सुर्यवंशी व नेहरू युवा केंद्राचे शुभम रणदिवे आदि उपस्थित होते. यावेळी युवकांनी तसेच जेष्ठ मंडळी व महीलांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज पाटील, विजय पाटील साहेबराव पाटील हरिष पाटील रामचंद्र चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले