सेवा परमो धर्म या ब्रीदवाक्याप्रमाणे गरजुंची सेवा करणाऱ्या जितेंद्र पाटील यांचा समाजरत्न पुरस्काराने सन्मान

IMG-20230826-WA0119.jpg

प्रतिनिधी – समाजात कित्तेक वंचित आणि गरजु अशा लोकांना योग्य माहिती नसल्याने तसेच हॉस्पिटलचा भरमसाठ खर्च परवडत नसल्याने आजारपणातच दुःखी जिवन कंठावे लागते अशा लोकांच्या अंधकारमय जीवनात एक आशेचा प्रकाश आणून त्यांचे जीवन दुःखमुक्त व निरामय करण्याचे कार्य आरोग्यंम धनसंपदा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील हे अविरतपणे करत आहेत

आणि त्यांच्या या कार्याची दखल साई धनवर्षा फाउंडेशनने घेऊन संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या वतीने समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आपल्याला प्रत्येकाला घरचे जेवण मिळण्याचे सौभाग्य लाभले आहे, परंतु समाजातील अशा बेघर आणि अनाथ मुलाच्या नशिबी मात्र हे भाग्य लाभत नाही, अशा अनाथ व गरजु मुलांना वेळोवेळी जेवण, कपडे शैक्षणिक साहित्य वाटप करणे.
तसेच विविध आजारांवर मोफत उपचार करणे, गरीब आणि गरजू रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रिया करून देणे, अपंगांना मोफत कृत्रिम अवयव बसवून देणे, कोरोना काळात उद्योग आणि कामे बंद पडल्यामुळे गरजूंना लागणाऱ्या घरगुती वस्तूंचे वाटप करणे, रस्त्यावरील उपाशी लोकांना अन्नदान करणे.

अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील यांनी लावलेल्या लहानशा रोपट्याचे कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांच्या माध्यमातून हळुवारपणे वटवृक्षात रूपांतर होत असल्याचे मत उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी व्यक्त केले

यासारखी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती विरळच असल्याने आणि संस्थेचे हे कार्य निरंतर असेच सुरू राहावे यासाठीदेखिल संस्थेचे अध्यक्ष जितेन्द्र पाटील व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित केले.


About Author

You may have missed

error: Content is protected !!