निष्ठावान शिवसैनिकाला थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन.
शिंदे गटाची ऑफर नकारल्याने आला फोन.
प्रतिनिधी – एरंडोल येथील माजी नगरसेविका कल्पना महाजन यांचे पती शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांना शिंदे गटातर्फे फोनवरून ऑफर आल्यावर महाजन दाम्पत्यांनी ऑफर नाकारत दशरथ महाजन यांनी राज्यसरकार व शिंदे गटावर सणसणीत आरोप केले होते.याच अनुषंगाने त्यांनी मोबाईल वर त्यांचे व शिंदे गटाच्या कार्यालयातून आलेल्या फोनची ऑडियो क्लिप देखील व्हायरल केली होती ती ऑडियो क्लिप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचल्याने त्यांनी स्वतः दशरथ महाजन यांना फोन करून सदर घटनेबाबत महाजन दाम्पत्यांशी बोलून सविस्तर चौकशी केली व त्यांना मुंबई येथे भेटीसाठी बोलावले.