एरंडोल येथे आदिवासी नव मतदारांसाठी विशेष शिबीराचे आयोजन..

Picsart_23-09-02_07-02-41-229.jpg

एरंडोल – दि. २९ ऑगस्ट २०२३रोजी १६ एरंडोल विधानसभा मतदार संघाच्या एरंडोल तालुक्यातील एरंडोल शहरात असलेल्या केवडीपुरा, भागातील आदिवासी नव मतदारांसाठी पंढरीनाथ मोरे यांच्या सहकार्याने विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीरात मनिष गायकवाड उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल तसेच तहसिलदार सुचिता चव्हाण यांनी स्वत: येऊन नव मतदार यांच्या नोंदणीचा बीएलओ मार्फत आढावा घेतला. या शिबीरात बीएलओ प्रकाश सुर्यवंशी, वैभव पाटील, आशिष परदेशी, विलास गाडीलोहार यांनी केवडीपुरा परीसरात जाऊन १५० आदिवासी नव मतदारांची नोंदणी केली. सदर विशेष शिबीरात निवडणुक शाखेचे नायब तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार किशोर माळी, निवडणुक शाखेचे महसुल सहायक मनोहर राजिंद्रे, व संगणक परिचालक ललित पाटील उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!