छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण समाजाचा मंगळवारी मोर्चा…
मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन शेखर बुंदेले यांनी केले आहे.
एरंडोल :-परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण ब्राम्हण समाजाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चात मोठया संख्येने सहभाग नोंदवा असे आवाहन ब्राह्मण महाशिखर परिषद भारत चे खान्देश विभाग संघटक शेखर आर बुंदेले यांनी केले आहे. यासंदर्भात बुंदेले यांनी म्हटले आहे की, परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची बऱ्याच दिवसापासून मागणी आहे.
समाजाच्या या महत्वपूर्ण प्रश्नावर सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी संपूर्ण ब्राम्हण समाजाच्या वतीने मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्तालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. रंगीन दरवाजा जवळील वंदे मातरम सभागृह येथून सकाळी ११.३० वाजता हा मोर्चा निघणार असून जळगाव जिल्ह्यातील समाजबांधवांनी यावेळी आवर्जून सहभाग नोंदवा असे आवाहन शेखर आर बुंदेले यांनी केले आहे.