कवी केशवसुतांच्या कवितेत जगण्याची दृष्टी..
कवी प्रवीण महाजन
एरंडोल, प्रतिनिधी .. कविश्रेष्ठ केशवसुतांच्या कवितेत जीवन जगण्याची दृष्टी असून त्यांच्या काव्यासौंदर्यातून साहित्यिकांच्या अनेक पिढ्या समृध्द झाल्या आहेत असे प्रतिपादन राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक प्रवीण महाजन यांनी केले.येथील रामचंद्र नगरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात आयोजिलेल्या कवी केशवसुतांच्या जयंती कार्यक्रम व राष्ट्रीय साहित्य संघाच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कंडक्टर पंडीत महाजन तर प्रमुख अतिथी पदी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकर सुरेश भावसार, पुरुषोत्तम महाजन, मधुकर रोकडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संघाच्या बैठकीत २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरला थोर समाजसुधारक महात्मा फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवसीय पहिले क्रांतिज्योती सावित्री ज्योतिराव साहित्य संमेलन ३ डिसेंबर २०२३ रोजी घेण्याचे सर्वानुमते ठरले. यावेळी छोटेखानी कवी संमेलनही संपन्न झाले.त्यात संघाच्या तालुकाध्यक्ष मंगला मधुकर रोकडे यांनी खरा आमुचा सन्मान, कवयित्री मनीषा रघुवंशी, सुखाची गाथा रचली या काव्य रचनेतून सुंदर भावार्थ पेरला तर ज्येष्ठ साहित्यिक निंबा बडगुजर यांच्या,भविष्य, नव्या दमाचे कवी रवी ठाकूर यांच्या सृष्टी तर कवी प्रवीण महाजन यांच्या आई अनुभवताना या कवितांनी देखील उद्बोधन केले.यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात पंडीत महाजन यांनी सांगितले की,कवी हा विचारी व ज्ञानसंपन्न व्यक्ती असून त्यांच्या ठायी असलेलं काव्य सौंदर्य मनाला भुरळ घालणारे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रवीण महाजन यांनी केले तर आभार कवी निंबा बडगुजर यांनी मानले.