एरंडोल महाविद्यालयाची साक्षी पाटील ला संशोधन स्कॉलरशिप मंजूर
एरंडोल :-येथील दादासाहेब दि. शं. पाटील महाविद्यालयातील तृतीय वर्ष विज्ञान (रसायनशास्त्र) या वर्गातील विद्यार्थिनी कु. साक्षी अजय पाटील हिला पुणे येथील Pune Knowledge Cluster या संस्थेकडून रसायनशास्त्र विषयामध्ये संशोधन प्रकल्पासाठी WEnyan Scholership दरमहा रु. १०,०००/- वर्ष २०२३-२४ करीता शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.
याबद्दल याबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील यांनी तिचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या., सदर विद्यार्थिनीला प्रा. सुनील सजगणे संशोधन मार्गदर्शक आहेत.
तिच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील, समन्वयक समन्वयक डॉक्टर अरविंद बडगुजर , रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. एन. ए. पाटील, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर स्वाती शेलार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी तिला संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.