शास्त्री फार्मसीत भरत क्षिरसागर यांचे क्लीनिकल ट्रायल्स वर व्याख्यान.
एरंडोल – शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल येथे २१ ऑक्टोबर २०२३ रोजी औषधांवरील वैद्यकीय चाचण्या, औषध नियामक व्यवहार, फार्मा आयटी विभाग आणि त्यांच्या नोकरीच्या संधी संदर्भात भरत क्षिरसागर यांचे एक उत्कृष्ट व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आणि त्यांच्यात नोकरीच्या संधी ही एक महत्वपूर्ण नवीन क्षेत्र फार्मसी विद्यार्थ्यांसाठी उदयास आली आहे परंतु याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये हवी तशी जागृती अजून यायची आहे, हे लक्षात घेता शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
भरत क्षिरसागर हे इंजिनस हेल्थकेयर या कंपनीचे संचालक आहेत तसेच अनेक फार्मास्युटिकल कंपनी मध्ये सल्लागार म्हणूनही कार्यरत आहेत , त्यांना या विभागांमध्ये एकूण १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे, त्यांनी क्लिनिकल ट्रायल्स या विषयी तपशीलवार माहिती दिली व संबंधित नोकरीच्या संधींबद्दल देखील माहिती दिली, भरत क्षिरसागर या उदयोन्मुख विभागांबद्दल तयारीच्या मार्गदर्शन आणि प्रेरणादायक वक्तृत्वासाठी प्रसिद्ध आहेत.
याच प्रसंगी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी एरंडोल व इंजिनस हेल्थकेयर इन्स्टिटयूट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य कराराचा फायदा शास्त्री इन्स्टिटयूट च्या विद्यार्थ्यांना स्वतःची कौशल्ये वाढविण्यास आणि त्या द्वारे नौकरीच्या अगणीत संधी मिळवण्यासाठी होईल असे मत उप-प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी व्यक्त केले, “विद्यार्थ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून वाढीव प्रेरणा मिळावी ही आमची इच्छा आहे व भरत क्षिरसागर यांच्या मौलिक संदेशामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मदत मिळेल असा विश्वास व्यक्त केला.”
संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री, प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि उप-प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णीच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गदर्शक व्याख्यान यशस्वीरित्या आयोजित केला गेला. या उपक्रमाच्या सफल आयोजनासाठी प्रा. जावेद शेख, प्रा. सुमेश पाटील, प्रा. आशिष वळवी व इतर प्राध्यापक वृंद , शेखर बुंदेले व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .