एरंडोलचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

IMG-20231101-WA0209.jpg

म. रा. मराठी पत्रकार संघाच्या प्रेरणादायी उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकार भारावले-उत्कृष्ट कार्य करणार्‍यांचा सत्कार

एरंडोल (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कार्य उत्तम असून पत्रकारांसाठी १० लाखांचा विमा कवच दिल्याबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रकार संघाचे कौतूक करून प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले. जळगांव येथील अल्पबचत भवनात संपन्न झालेल्या पत्रकार गौरव कार्यक्रमात ना. गुलाबराव पाटील बोलत होते.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रक़ार संघाने पत्रकार, उद्योजक, उल्लेखनिय कार्य करणार्‍यांचा यावेळी सत्कार, सन्मान केला. सदरप्रसंगी एरंडोलचे ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव यांचा जीवन गौरव पुरस्कार देवून सत्कार, सन्मान ना. पाटील यांचे हस्ते करण्यात आला. सदरप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, म. रा. मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, ज्येष्ठ पत्रकार तथा अधिस्विकृती समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष यदू जोशी, मंत्रालय विधीमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, श्री. मंगळग्रह संस्थान अमळनेरचे अध्यक्ष दिगंबर महाले, मंत्रालय विधीमंडळ पत्रकार संघाचे सदस्य कमलाकर वाणी (लोकशाही जळगांव), साईमतचे संपादक प्रमोद बर्‍हाटे (जळगांव), उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे यांचेसह महामंडलेश्वर जनार्दन महाराज (फैजूपर) यांची विशेष उपस्थिती व्यासपीठावर लाभली.
यावेळी मान्यवरांनी पत्रकारांचे कामाचे योग्य मूल्यमापन व्हावे, सवलती, अधिस्विकृती, वसाहत, मानधन, निवृत्तीबाबत मार्गदर्शन केले. ना. गुलाबराव पाटील यांनी पत्रक़ारांच्या कार्याचे कौतूक करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. सदरप्रसंगी अल्पबचत भवनात ग्रामीण पत्रक़ारांची उपस्थिती लक्षणिय होती. प्रा. शिवाजीराव अहिरराव यांना जीवन गौरव पुरस्कारप्रसंगी माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव, संपादक मृदूल अहिरराव उपस्थित होते.
सदरप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल एरंडोलचे डॉ. नरेंद्र ठाकूर, शैक्षणिकसाठी विजय शिवाजी पाटील, उद्योग क्षेत्रासाठी बालाजी उद्योग समुह एरंडोल यांना देखील सन्मानित करण्यात आले. एरंडोलचे मराठी पत्रकार संघाचे तालूकाप्रमुख तथा पत्रकार संजय चौधरी यांनी विशेष परिश्रम घेवून यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले. यावेळी एरंडोलचे ओम त्रिवेदी, प्रसाद दंडवते, अमोल जाधव, अशोक भवार आदींची उपस्थिती होती.

About Author

You may have missed

error: Content is protected !!