एरंडोल काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी सुनील पाटील
एरंडोल : तालुक्यातील बामणे येथील
काँग्रेसचे कार्यकर्ते सुनील गोविंदा पाटील यांची एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीपत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्याकडून प्राप्त झाले आहे.
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, आमदार शिरीष चौधरी, प्रदेश प्रतिनिधी विजय महाजन, डॉ. फरहाज बोहरी, डॉ. प्रशांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.