ना.अनिल पाटील यांच्या हस्ते एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कार्यकारणी घोषित,
तालुकाध्यक्षपदी अमित पाटील.
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्याची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची तालुका कार्यकारिणी ना. अनिल पाटील मंत्री मदत नर्वसन ,जिल्हा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार , डॉ. सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे पार पडली .याप्रसंगी ना. पाटील यांचे हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी एरंडोल तालुका अध्यक्षपदी अमित राजेंद्र पाटील , कार्याध्यक्ष उमेश श्रीराम पाटील, शहराध्यक्ष गोरख जगन्नाथ चौधरी, शहर उपाध्यक्ष सुहास महाजन, ओबीसी सेल तालुका अध्यक्ष गुलाब विठ्ठल महाजन. शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष मुस्ताक खाटीक, तालुका व्यापारी आघाडी सेल नितीन डी पाटील, तालुका वाहतूक सेल अध्यक्ष जगदीश महाजन , तालुका शिक्षक सेल अध्यक्ष नितीन पाटील, योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.