राष्ट्रीय विकलांग पार्टीच्या आंदोलनाला यश,बोदवड रेल्वे स्टेशन वर थांबणार हुतात्मा एक्स्प्रेस!
विशेष प्रतिनिधी – बोदवड ता.बोदवड:- राष्ट्रीय विकलांग पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड यांच्या वतीने दि.९ ऑगस्ट रोजी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते, आंदोलनामध्ये आमदार चंद्रकांत पाटील,व्यापारी संघटना,प्रवासी संघटना यांनी पाठिंबा दर्शवून स्वतः उपस्थित राहून या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते,त्याच आंदोलनाला थोड्या प्रमाणात यश आल्याचे दिसून येत आहे.
दि.१३ रोजी पासुन हुतात्मा एक्सप्रेस थांबा मिळाल्याने नागरिकांमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येत आहे.कोरोना काळापासून बोदवड तालुका तसेच मुक्ताईनगर,जामनेर तालुक्यातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे निदर्शनास आल्याने राष्ट्रीय विकलांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष धनराज गायकवाड यांनी रेल रोको आंदोलन बोदवड
रेल्वे स्टेशन वर केले होते,त्यालाच आज यश आल्याचे दिसून येत आहे.
उर्वरित एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा याकरिता राष्ट्रीय विकलांग पार्टीचा पाठपुरावा सुरु राहणार असे गायकवाड यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शवून उपस्थिती दिली होती,विशेष सहकार्य पत्रकार संघटनेच्या मार्फत आवर्जून पाठिंबा देत सोशल मीडियावर सर्वांनी सहकार्य केले होते.गोपालजी अग्रवाल, सुरेश वर्मा,विकास कोटेचा,पत्रकार गोपाल व्यास,महेंद्र पाटील,अमोल आमोदकर,निवृत्ती ढोले,पुरुषोत्तम गड्डम,संदिप बैरागी,अर्जुन आसने,जिया शेख,अमोल व्यवहारे यांचे विशेष सहकार्य होते.