एरंडोल महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

IMG-20231130-WA0127.jpg

प्रतिनिधी – दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल आणि अमितदादा पाटील फाउंडेशन, एरंडोल यांच्या सयुंक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर मेळाव्यासाठी हयूरिस्टिक टेक्नोपार्क नाशिक व मल्टिनॅशनल , डेटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड नाशिक या कंपनी मार्फत मुलाखती घेण्यात आल्या. एकूण १०६ विद्यार्थी मुलाखतीसाठी उपस्थित होते, त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांना नियुक्ती पत्र लगेच देण्यात आले. रोजगार मेळावा उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमितदादा फाउंडेशनचे प्रमुख माननीय दादासाहेब अमित पाटील (अध्यक्ष- य. च. शि. प्र. मंडळ, एरंडोल ) यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणातून आलेल्या संधीचे सोने करावे तसेच रोजगार मिळवून स्वतःचा विकास करता-करता गावाचे, आई-वडिलांचे व महाविद्यालयाचे नाव उंचावेल असे गौरव उदगार व्यक्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हि एक पर्वणीच आहे असे नमूद करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. ए. जे. पाटील यांनी प्रमुख अथिति म्हणून मनोगत व्यक्त केले. प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. एन. ए. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. विजय गाढे यांनी तर आभार डॉ. अतुल पाटील यांनी मानले. मुलाखत घेण्यासाठी नाशिक येथुन कमलेश चिचे (सिनियर मॅनेजर एच. आर.) विनय महाजन, गोकुल लोखंडे, तेजस गायकवाड, किशोर सोनवणे, संदीप सूर्यवंशी, दिनेश वाडिले उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर, डॉ. नितीन दांडेकर, प्रा. ए. टी . चिमकर, डॉ. बी. व्ही. पवार, डॉ. एस. एम. साळुंखे, प्रा. एस . पी. वसावे, प्रा. एस. एन. विसपुते, श्री. नितीन पाटील (स. ग्रंथपाल ) व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. संदीप कोतकर, डॉ. अतुल पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. जितेंद्र महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर रोजगार मेळाव्यात निखत शेख फारूक, उर्मिला मराठे, पूजा मोरे, सायली शिंपी, प्रमोद मराठे, कमलेश पाटील तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजचे नियुक्ती पत्र देण्यात आले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!