खडके बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची बिनविरोध निवड…
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सदस्यांची गुरुवारी बैठक होऊन उपसरपंच पदी पार्वताबाई भास्कर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर डी महाजन गटशिक्षणाधिकारी यांनी कामकाज पाहिले यांना ग्राम विस्तार अधिकारी अंकुश पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच दीपक भिल ग्रामपंचायत सदस्य भिकुबाई पाटील माधुरी साळुंखे जुलाल चौधरी शंकरलाल काबरा मंगेश पाटील भालेराव पाटील किशोर पाटील उर्फ धनु निंबा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला