एरंडोल येथे नथ्थू महाराजांना उत्साहात हिंदू बांधवांनी चढवली भगवी चादर.

SRI_8087-02.jpeg

प्रतिनिधी – एरंडोल येथील हिंदू – मुस्लिम ऐकतेचे प्रतिक असलेले नथ्थू महाराज यांचा सध्या उरुस सुरु आहे.याप्रसंगी शहरातील पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे भगवी चादर चढविण्यात आली.
सालाबादप्रमाणे यंदाही दुपारी ४ वाजता भगवा चौक येथून फुलांची चादर घेऊन चादरीची वाजतगाजत श्री.रामांच्या मंदिरात पूजा विधी करुन शहरातील पुरातन जयगुरू व्यायाम शाळेत चादर घेऊन जाऊन नारळ वाढवून पांडववाडा येथील हनुमान मंदीरात आरती करुन भगव्या चादरीवर फुलांची चादर चढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तब्बल ५ तास चाललेल्या मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने युवक सामील झाले होते.मिरवणुक पांडववाडा हनुमान मंदिर,ब्राह्मण ओटा,मारवाडी गल्ली,भगवा चौक,मेनरोड मार्गे नथ्थू महाराज यांच्या समाधी स्थळापर्यंत काढण्यात आली.याप्रसंगी मिरवणुक मार्गावरील विठ्ठल मंदिरात व गणपती मंदिरात नारळ वाढवण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.भगव्या रंगाची चादर व नथ्थू महाराज यांची प्रतिमा सजविलेले वाहन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.हजारो युवक मिरवणुकीत तालबद्ध पद्धतीने थिरकत होते.सर्वांनी डोक्यावर पांडव नगरी लिहलेली टोपी परिधान केली होती.शेवटी नथ्थू महाराज यांच्या समाधी स्थळावर पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी व उरुस कमिटीच्या सदस्यांनी भगवी चादर अर्पण केली.

About Author

You may have missed

error: Content is protected !!