एरंडोल आगारातून वडनगरी येथे शिवपूराण कथेसाठी जादा बसेस
प्रतिनिधी – एरंडोल आगारातून वडनगरी येथे होणाऱ्या पू. पंडित मिश्राजी यांच्या होणाऱ्या शिवपुराण कथेसाठी सकाळी ७.०० वाजेपासून दर १ तासांनी दुपारी २.३० वाजेपर्यंत तब्बल १० बसेस सोडण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख नीलिमा बागुल , स्थानक प्रमुख गोविंद बागुल , योगिता बर्हाटे यांनी कळवले आहे.
तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत दिली जाणार आहे. तरी भाविकांनी सदर संधीचा लाभ घ्यावा.