पोलिस मित्र संघटनेच्या जिल्हा महीला अध्यक्षपदी एरंडोल येथील सरोजबाई यांची निवड

IMG_20231205_202842.jpg

प्रतिनिधी एरंडोल – येथील सौ सरोजबाई केवलसिंग पाटील यांच्या समाजातील विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची पोलीस मित्र संघटनेच्या जिल्हा महीला कार्याध्यक्षपदि निवड करण्यात आली. सरोजबाई गेल्या २० वर्षांपासुन महिलांच्या व समाजातील विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहेत.

महिलांना बचत गटांच्या माध्यमातुन आर्थिक मदत मिळवुन देऊन व त्या मिळालेल्या आर्थिक मदतीतुन नविन व्यवसाय सुरू करून देऊन त्यांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणे, महिलांच्या कौटुंबिक समस्या सोडवणे.
निराधार महिलांना विविध योजनांअंतर्गत मासिक पेन्शन मिळवुन देणे, व्यवसाय सुरू करण्यासाठी शिलाई मशिन मिळवुन देणे अशी अनेक कामे सरोजबाई करत आहेत.



तसेच मोफत रेशनकार्ड तयार करून देणे, मोफत आरोग्य कार्ड तयार करून देणे, शेतकऱ्यांना बियाण्यांचे मोफत वाटप, चष्यांचे मोफत वाटप ई. अनेक कामे सरोजबाई अनेक वर्षांपासुन करीत आहेत आणि म्हणुनच त्यांच्या या समाजपयोगी व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची जळगाव जिल्हा महिला कार्याध्यक्षl निवड करण्यात आली.

तसेच त्यांचे सुपुत्र आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील देखिल संपुर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे राबवुन गोरगरीब रुग्णांना मदत करणे आईच्या समाजकार्याचा वसा व वारसा पुढे चालवत आहेत.सरोजबाईंच्या या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी योग्य व्यक्तीला पद मिळाल्याचे समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत ईतर महिलांनी यापासुन प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!