एरंडोल तहसील कार्यालयास उपायुक्त विठ्ठल सोनवणे यांची भेट……
प्रतिनिधी एरंडोल – उपायुक्त विठ्ठल सोनवणे यांनी १२ डिसेंबर 2023 रोजी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील एरंडोल तालुक्याच्या मुख्यालयी तहसील कार्यालयाला भेट दिली यावेळी मतदारांच्या सहा सात व आठ या विविध फार्माची तसेच शिक्षक मतदार संघाच्या फॉर्म क्रमांक 19 ची तपासणी करण्यात येऊन तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या समवेत प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव निवडणूक महसूल सहाय्यक मनोहर नामदेव राजीद्रे यांच्यामार्फत निवडणूक विषयक कामांचा आढावा घेण्यात आला तसेच महसूल विषयक कामात ई रेकॉर्डची माहिती महसूल नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी दिली…
यावेळी पिंपळकोटा बुद्रुक येथील मतदान केंद्राला उपयुक्त यांनी भेट दिली दरम्यान त्यांनी बीएलओ यांच्या मतदार यादी व इतर कामांची चौकशी केली यावेळी ग्रामस्थ पर्यवेक्षक विनायक मानकुमरे उदय निंबाळकर मुकेश जाधव दीपक ठोंबरे मनोहर शिंपी आदी उपस्थित होते…..