एरंडोल शिवारातील अकृषक परवानगी च्या मिळकतीबाबत हस्तांतरणास मनाई हुकुम आदेश पारीत

29_08_2020-justice_20685153_165750223.jpg

प्रतिनिधी – एरंडोल शिवारातील गट नं. १०८२/४ बाबत प्रलंबीत एन ए प्रस्ताव असतांना एरंडोल दिवाणी न्यायालयाने त्रयस्थ व्यक्तीस हस्तांतरण , तबदील वा खरेदी विक्री करण्याबाबत दि. १९ डिसेंबर २०२३रोजी मनाई हुकूम चा आदेश पारीत केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल येथील गट क.१०८२/२ व १०८२/३ चे मालक अस्लमखान नय्युम खान यांच्या ०.८ आर व ०.१४ आर अऱ्या क्षेत्रफळा, वर गटनं १०८२/१ आणी १०८२/४ चे शेत मालकांनी अतीक्रमण करून ताबा व कब्जा केलेला असल्यामुळे त्यांनी संबंधीत शेत मिळकतीचे मालक अनिता रुपचंद वगैरे व साहेबराव सुका महाजन वगैरे विरुद्ध एरंडोल दिवाणी न्यायालयात १९ डिसेंबर २०२३ रोजी रे.मुं.न.३५/२०२३ दावा दाखल केला संबंधीत साहेबराव सुका महाजन वगैरे यांनी गट नं १०८२/४ बाबत दि. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी रक्कम १ करोड ८० लाख साठी कब्जासह सौदा पावती नोटरी करारनामा केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिल्याने न्या‌याधिश कनिष्ठ स्तर एरंडोल विशाल धोंडगे यांनी साहेबराव सुका महाजन वगैरे विरुद्ध गट नं. १०८२/४ खरेदी विक्री , तबदील हस्तांतरण करण्यास एकतर्फी मनाई हुकूम आदेश पारीत केला आहे.
सदर मिळकतीबाबत आशीर्वाद जगन्नाथ पाटील व शेख लतीफ शेख अब्दुल यांचे सोबत सौदा पावती करारनामा करण्यात आलेला आहे . अस्लमखान नय्युम खान यांच्या तर्फे ॲड. मोहन बी. शुक्ला कामकाज पाहत असून ॲड. सुजीत पाठक सहकार्य करित आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!