इंडिया आघाडी तर्फे संसदेत झालेल्या स्मोक हल्याचा निषेधार्थ तहसीलदारांना दिले निवेदन
प्रतिनिधि – भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे हिवाळी अधिवेशन चालू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे. अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे हा लोकशाही वरील अभूतपूर्व हल्ला असून केंद्रातील भाजप सरकार धक्कादायकपणे विरोधी पक्षाच्या १४२ खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून बाहेर काढते, ही एक प्रकारे लोकशाही तत्त्वांची नग्न हत्या आहे. लोकशाहीला स्मशान बनवण्याचे काम भाजपकडून सातत्यपणे होत आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने निर्दयीपणे केलेल्या लोकशाही मूल्यांचा हत्येच्या इंडिया आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत.
सदर एरंडोल तालुका इंडिया आघाडीचा वतीने निषेध व्यक्त करून व मोदी सरकार विरोधात “नही चलेंगी नही चलेंगी तानाशाही नहि चलेंगी”
“मोदी सरकार हाय हाय” अशा घोषणा देण्यात आल्या.
निवेदन देताना सुनील गोविंदा पाटील (कॉ ता.अध्यक्ष) ,
डॉ.राजेंद्र देसले (रा.काँ ता अध्यक्ष) , रवींद्र भाऊ चौधरी (शिवसेना उबाठा ता.अध्यक्ष) ,विजय पंढरीनाथ महाजन ,
नाना पोपट महाजन , डॉ. फरहाज बोहरी , किशोर भाऊ निंबाळकर , दशरथ भाऊ महाजन , जगदीश दादा पाटील ,
शेख कलीम हुसेन , प्रा.आर एस पाटील , रोहिदास पाटील ,
रवींद्र डी पाटील , डॉ. प्रशांत पाटील , एकनाथ पाटील ,
अब्दुल हक देशमुख , शेख सांडू मोहम्मद ,अयाज भाई मुजावर , सय्यद अंजुम शौकत अली , कमर अली सय्यद
मदनलाल भावसार , गुलाब सिंग पाटील , सागर पाटील निपाणे यांच्या उपस्थिती मध्ये तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.