घरकुल योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा
एरंडोल कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कायम करण्याची मागणी..
एरंडोल : प्रधानमंत्री आवास योजनेसाठी विविध पदे मानधन तत्वावर शासनाकडून भरण्यात आलेली आहेत. या पदावर उच्चशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना नुकतेच देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपरिषद स्तरावर शहर स्तरीय तांत्रिक कक्षातील सिव्हिल इंजिनिअर, समाज विकास तज्ज्ञ, एमआयएस स्पेशालिस्ट ही पदे मानधन तत्वावर शासनाकडून भरण्यात आलेली आहेत. या कर्मचाऱ्यांना सुमारे पाच ते सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. अद्याप कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली
नाही, त्यामुळे मानधनात ५० टक्के बाढ करण्यात यावी, असेही नमूद केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे या ही कर्मचाऱ्यांना एच. आर. पॉलिसी लागू करावी यासह विविध सुविधा मिळण्याचीही मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ण व्हाव्यात यासाठी जळगाव जिल्ह्यातील सीएलटीसी कक्षातील सर्व कर्मचाऱ्यांनी संघटनेमार्फता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना सीएलटीसी अभियंता संघटनेचे राज्यध्यक्ष विशाला वानखेडे, प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पाटील जिल्हाध्यक्ष भूषण महाजन उपाध्यक्ष विक्रांत चौधरी, विजेंद्र निकम अजिंक्य शिंपी, जगदीश महाजन ललित महाजन, वैभव पाटील आदी उपस्थित होते.