श्री काळेश्वरी दिनदर्शिका २०२४ व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न
विशेष प्रतिनिधी (सनी आडेकर) ता दापोली,जि रत्नागिरी, गाव आमखोल येथील सुप्रसिद्ध आमखोल ग्रामस्थ मंडळ (मुं)हे कला ,क्रिडा,राजकीय,शैक्षणिक,सामाजिक,अशा विविध क्षेत्रात कार्यरत व आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे ,सामाजिक कार्यात व गावच्या सर्वागिण विकासाला झोकुन देणारे असे नामांकीत ग्रामस्थ मंडळ आहे या मंडळाने नुकतेच आनंदि सभागृह,आचोळे रोड,नालासोपारा ,या ठिकाणी ३१ डिसेंबर म्हणजेच नववर्ष पुर्वार्धाला ‘श्री काळेश्वरी माता दिनदर्शिका २०२४,प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडले सर्वप्रथम ग्रामदेवतेला वंदन करुन श्रीफळ फोडुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम श्री काळेश्वरी दिनदर्शिका २०२४ या दिनदर्शिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आणि १० वी १२ वी परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करणार्या विद्यार्थाचा सन्मानपत्र व ट्रॅाफी देवुन मान्यवरां करवी सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रमुख मान्यवर यांचाही सन्मान केला गेला त्याचप्रमाणे गावातील भगिणी,मातांचा व महिलांचा सन्मान करण्यात आला मान्यवरांनी आपल्या केलेल्या छोटेखानी कौतुकपर भाषणात गावातील विकास,राजकीय घडामोडी,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त यांनी घेतलेली अविरत मेहनत या सर्व विषयांवर भाष्य केले यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थ ,काळेश्वरी क्रिकेट संघ ,आमखोल कला मंच ,आजी माजी जेष्ठ मान्यवर , याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचा हातभार लागला असे मुंबई कमिटीचे चंद्रकांत पां गावणुक , महेंन्द कि गावणुक, अनंत ता आडेकर, अनंत र गावणुक , अमित सि गावणुक , आतिष पा पवार ,तसेच बबन दा गावणुक , रविंद्र भि आडेकर, यशवंत ग पवार , प्रकाश पां गावणुक , नरेश गो करण , संजय ग बंगाल, पांडुरंग गावणुक , व या कार्यक्रमा साठी खास गावावरुन मुंबई या ठिकाणी उपस्थित राहिलेले मान्यवरांमध्ये मा सरपंच नितीन भि दुर्गवले, भिकु गो दुर्गवले, रघुनाथ भा मांडवकर, यांनी उपस्थित राहुन गावप्रती आपले आदरातिथ्य उपस्थितीने दाखवुन दिले अल्पाेहार, व शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रम खेळीमेळीने शुभेच्छांसह उत्साहपुर्ण ,स्नेहपुर्वक,यशस्वी पार पाडला