एरंडोल येथे पत्रकार दिन साजरा..!
प्रतिनिधी एरंडोल: येथे तालुका पत्रकार संघातर्फे ६जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त तहसीलदार अरुण माळी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी आद्य पत्रकार कै.बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवदन करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर शिरसाठ यांनी केले. याप्रसंगी प्रल्हाद पाटील(आडगाव), चंद्रभान पाटील(निपाणे), कैलास महाजन,राजधर महाजन, राजीव ठक्कर यांची समयोचीत भाषणे झाली आभार प्रदर्शन पत्रकार शैलेश चौधरी यांनी केले.
यावेळी आरोग्यदूत विकी खोकरे, प्रविण महाजन,पंकज महाजन,प्रमोद चौधरी,दिपक बाविस्कर,उमेश महाजन आदी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अजय महाजन उपस्थित होते.
पत्रकार हा सदैव समाजाचा जागल्या म्हणून कार्यरत असतो. पत्रकारांनी दिलेल्या बातम्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न, समस्या वेशीवर टांगल्या जावून समाजाला योग्य दिशा मिळते असे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार अरुण माळी यांनी केले.