गांधीपुरा तिळवण तेली समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड, मावळत्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान..!

InCollage_20240113_193835354.jpg


एरंडोल:  येथे गांधीपुरा भागातील तिळवण तेली समाज संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी व मावळते पदाधिकारी यांच्या सन्मानाचा कार्यक्रम माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली १२जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी जयहिंद चौक परिसरात करण्यात आला.
सत्कारार्थिंमध्ये विलास माधव चौधरी(अध्यक्ष),नितिन लक्ष्मण चौधरी(उपाध्यक्ष),सागर अशोक चौधरी(सचिव), रविंद्र.पांडुरंग चौधरी(खजिनदार) व संजय नत्थू चौधरी(सहसचिव) यांचा समावेश होता तर मावळते पदाधिकारी हरिश्चंद्र महारू चौधरी,आर.डी.चौधरी,दशरथ पांडुरंग चौधरी,ज्ञानेश्र्वर रतन चौधरी,नंदलाल संतोष चौधरी,राकेश वसंत चौधरी यांचेसह इतर पदाधिकाऱ्यांचा शाल,श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
एरंडोल येथे तिळवण तेली समाजा चे संघटन बळकट व मजबूत असल्याबद्दल वक्त्यांनी प्रशंसोद्गार काढले.

प्रारंभी भगवद्भक्त संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन होऊन माल्यार्पण करण्यात आले.
तिळवण तेली समाजातील विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मान्यवर उदयभान चौधरी,अनिल जगन्नाथ चौधरी,अशोक सुकदेव चौधरी,राजेन्द्र दोधू चौधरी,आनंदा रामदास चौधरी,गुलाब पुंडलिक चौधरी आदी मान्यवरांचा समाजाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

समाजाचे मावळते सचिव हरिश्चंद्र चौधरी यांनी प्रास्ताविकातून समाजहिताचे विविध उपक्रमांबाबत सविस्तर विवेचन केले.
माजी नगराध्यक्ष राजेन्द्र दोधू चौधरी,आनंदा रामदास चौधरी,गुलाब पुंडलिक चौधरी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दशरथ चौधरी व राकेश चौधरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन शैलेश चौधरी यांनी केले.
यासमयी सर्व समाजबांधव,महीला, युवक व नागरीक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

About Author

You may have missed

error: Content is protected !!