सुरक्षित सप्ताह अभियान सप्ताह निमित्त ओम शांती केन्द्र तर्फे मार्गदर्शन
प्रतिनिधी – रा. प. एरंडोल आगार येथे सुरक्षित सप्ताह अभियान दिनांक ११ जानेवारी २०२४ ते २५ जानेवारी २०२४ पर्यंत सुरक्षित सप्ताह चे आयोजन करण्यात आलेले आहे त्याप्रसंगी ओम शांती केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी अनमोल मार्गदर्शन करून सर्व चालक वाहक यांना सुरक्षित वाहन चालवण्या संबंधी सूचना व उपाययोजना सांगितल्या तसेच इंगळे सर यांनी मनोगत व्यक्त केले ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच जळगाव विभागीय वर्कशॉप अधिकारी सुनील भलतिडक साहेब यांनी मार्गदर्शन केले. या वेळी स का य श्रीमती भारती बागले , बस स्थानक प्रमुख गोविंदा बागुल,टी आई योगिता ब्ररांठे,आगार लेखाकार चौधरी साहेब ,चालक वाहक यांत्रिक कर्मचारी हजर होते