कासोदा येथे उ. बा. ठा. शिवसेनेचा तालुका मेळावा व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

InCollage_20240113_201553978.jpg

कासोदा (प्रतिनिधी) नुरुद्दीन मुल्लाजी :- येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा एरंडोल तालुका मेळावा व विविध मान्यवरांचा पक्षप्रवेश सोहळा काल 12 जानेवारी रोजी शिवसेनेच्या मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. सद्यस्थितीतील होणाऱ्या राजकीय घडामोडी पाहता या मेळाव्यात बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ, विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन उ बा. ठा.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने, माजी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन , शिवसेना वक्ते विठ्ठल रावजी पाटील शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन महिला आघाडी प्रमुख सौ महानंदा पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक सुरेश आण्णा पाटील शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आडगाव येथील नंदिनी माळी या युवतीने नार्वेकरांच्या अपात्रतेच्या निकालावर आधारित उपरोधिक अहिराणी गीत गाऊन उपस्थित शिवसैनिकांची मने जिंकून घेतली. यावेळी परिसरातील अनेक युवकांनी व मान्यवरांनी उ.बा.ठा. शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात जिल्हाप्रमुख हर्षल माने यांनी उपस्थित शिवसैनीकांना एकनिष्ठ राहून आगामी काळात फितूरांना धडा शिकवण्याचे आवाहन करीत सर्वांनी कामाला लागावे असे सांगितले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा संघटक किशोर भाऊ निंबाळकर होते.कार्यक्रमास शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, आडगाव फरकांडे विभाग प्रमुख दिलीप (गुड्डु )चौधरी, उ. बा. ठा. शिवसेनेचे युवा सेना पदाधिकारी, महिला आघाडी, वाहतूक सेना वकील सेना, व्यापारी आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी, पदाधिकारी तसेच एरंडोल पारोळा येथील पदाधिकारीउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एरंडोल तालुका प्रमुख रवींद्र चौधरी तर सूत्रसंचालन राजेंद्र ठाकरे यांनी कले

About Author

You may have missed

error: Content is protected !!