एरंडोल येथे रक्तदान शिबिरात १७० रक्त दात्यांनी केले रक्तदान..!
एरंडोल: येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त, तसेच अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्रीरामाच्या भव्यदिव्य मंदिरात रामलल्ला च्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होत आहे त्या निमित्ताने,तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असल्या निमित्ताने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी-शाखा एरंडोल व माधवराव गोवळकर स्वयंसेवी रक्तपेढी व संकलन केंद्र-जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २१जानेवारी २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १७० रक्तदात्यांनी रक्तदान केलें.
रक्तदान शिबिरासाठी गोळवलकर संस्थेचे श्रीयुत चेतन दुसाने, डॉ. मकरंद वैद्य, रामचंद्र पोतदार, मधुकर सैंदाणे, सुनील अनपट, श्रीकांत मुंडले, सचिन देवरे,उज्वला पाटील, उदय सोनवणे यांनी रक्त संकलनाचे कार्य केले. एरंडोल येथील पंकज काबरा, उल्हास लढ्ढा, राहुल तिवारी, नरेंद्र जयवीरसिंह पाटील,पोलीस निरीक्षक सतिश गोराडे, बस स्थानक प्रमुख गोविंद बागुल, किशोर मोराणकर, डॉ.संभाजीराजे पाटील,डॉ.आर.बी.पाटील, डॉ.सुरेश पाटील, डॉ.पिंगळे यांनी भेट दिली तर प्रा.जी.आर महाजन,नरेश डागा,प्रसाद दंडवते,आर.डी.पाटील,दिपक पाटील,मंगेश पाटील,राजेंद्र पाटील,संजय सुर्यवंशी,श्रेयस बडगुजर,निलेश पांंडे,संदिप महाजन,रविंद्र कुलकर्णी, महाले, जोशी आदिंनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.