एरंडोल येथे मैत्री सेवा फाऊंडेशन चा वर्धापन दिन साजरा.

IMG-20240116-WA0014.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथे मैत्री सेवा फाऊंडेशन चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी सकाळी वाचनालयात प्रतिमा पुजन करण्यात आले तसेच एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिष गोराडे, तहसिलदार सुचिता चव्हाण,पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे,शरद बागल यांच्या हस्ते मैत्री सेवा फाऊंडेशन दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.सदर दिनदर्शिका दरवर्षी संपूर्ण शहरात निःशुल्क वितरित करण्यात येते. मैत्री फाऊंडेशन ही गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे.मागील १० वर्षांपासून निरंतर निस्वार्थपने समाजसेवा करीत आहे.
याप्रसंगी अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर अभ्यासिके चा विस्तार वाढविला तर आमच्या मित्र मैत्रिणी ज्यांना जागे अभावी बाहेर बसावे लागते त्यांना फायदा होईल व बऱ्याचदा आम्हाला ही बाहेर बसावे लागते तर आमची ती गैरसोय होणार नाही अशी व्यथा मांडली व यावर संस्थेच्या पदाधिकारी यांनी आम्ही लवकरच यावर उपाय शोधून सर्वांना बसण्याची व्यवस्था करु असे आश्वासन दिले.
यावेळी फाऊंडेशन तर्फे खासदार उन्मेश पाटील व आमदार चिमणराव पाटील यांना विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या प्रयत्नांतून अभ्यासिकेच्या वाढीव बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा,वाचनालयाच्या खुल्या भूखंडावर संरक्षक भिंत बांधून द्यावी,आपण दिलेल्या ओपन जिम वर हाय मास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!