धरणगाव येथे युवती सभेतर्फे पारंपारिक परिवेश दिन 2024 ,युवती सभा उद्घाटन व शिवजयंती साजरी
प्रतिनिधी – कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथे युवती सभेतर्फे पारंपारिक परिवेश दिन २०२४ , युवती सभा उद्घाटन व शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा पंकज देशमुख लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून एरंडोल येथील ॲड. प्रतिभा पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते युवती सभेचे उद्घाटन करण्यात आले त्यांनी विद्यार्थ्यांना जिजाऊ मातेची शिकवण किती महत्त्वाची आहे तसेच मुलीं संदर्भातील कायदे जसे अश्लीलता विरोधी कायदा कलम २९२ ते २९४ काय आहे , पोक्सो कायदा लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ यासंदर्भात मुलींना व मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा पंकज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्धता जीवनात कशी आणावी तसेच विद्यार्थ्यांनी आनंद आणि अभ्यास या दोन्हीकडे लक्ष दिले गेले पाहिजे असे सुचवले
सूत्रसंचालन डॉ कांचन महाजन यांनी केले. प्रास्ताविक डॉ. ज्योती महाजन युवती सभा चेअरमन यांनी केले. IQSC समन्वयक प्रा.सऺदिप पालखॆ व विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. स्वप्निल खरे यांची उपस्थिती होती. युवती सभा सदस्य प्रा.पूर्वो कुलकर्णी , प्रा.सुलताना पटेल , प्रा श्रद्धा चौटे यांची उपस्थिती होती व सर्व कॉलेजमधील विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार डॉ सुषमा तायडे यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व युवती सभा सदस्य , किरण सुतारे , सुरज, दीपक , दुर्गेश भैय्या यांचे सहकार्य लाभले तसेच विद्यार्थी पंकज, शुभम , दिनेश , प्रथमेश , अनंता व विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले