भाजप युवा मोर्चाच्या जिल्हासरचिटणीसपदी पिंटू राजपूत.
एरंडोल-येथील पिंटू राजपूत यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष परेश पाटील , भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचेसह पदाधिका-यांच्या उपस्थितीत पिंटू राजपूत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पिंटू राजपूत यांनी यापूर्वी देखील जिल्हा चिटणीस व जिल्हा
सरचिटणीस म्हणून काम पाहिले असून पक्षाचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.राजेंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यप्रदेश,राजस्थान,आणि गोवा या राज्यातील अनेक
विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात युवकांचे संघटन करून पक्षसंघटना मजबूत करणार असल्याचे पिंटू राजपूत यांनी
सांगितले. प्रदेश सचिव विजय चौधरी , संघटनमंत्री रवी अनासपुरे,खासदार उन्मेष पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार , जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी , तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील , शहराध्यक्ष नितीन महाजन , माजी नगरसेवक सुनील पाटील , माजी तालुकाध्यक्ष एस. आर. पाटील , जिल्हासरचिटणीस निलेश परदेशी यांचेसह पदाधिका-यांनी पिंटू राजपूत यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.यावेळी सचिन विसपुते , माजी नगरसेवक योगेश महाजन,शाम ठाकूर , अजित पाटील , अजेंद्र पाटील,अमर राजपूत , ॲड.मधुकर देशमुख , जगदीश ठाकूर , यश महाजन , ज्ञानेश्वर कंखरे,आनंद सूर्यवंशी , भगवान मराठे, भूषण बडगुजर , मोहित परदेशी , बाजीराव पांढरे यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.