लाचखोर विद्युत निरिक्षक लाचलुचपत च्या जाळ्यात.

images-9.jpeg

प्रतिनिधी :– दि.२७ रोजी जळगाव येथील लाचखोर खाते उद्योग,उर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरिक्षक(वर्ग १) गणेश नागो सुरळकर (वय.५२) जळगांव जि.जळगांव रा.पार्वती नगर जळगाव याला १५ हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात त्यांचे कडे यासाठी परवाना आहे. सदरचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी आलो से यांचेकडे अर्ज केला होता. सदर लायसन चे नूतनीकरण करण्यासाठी आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडे १५ हजार रुपये लाचेची मागणी करून आज रोजी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक श्री.माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली,जळगांव जिल्ह्याचे ला.प्र.विभाग पोलीस उप अधीक्षक,सापळाचे प्रमुख श्री.सुहास देशमुख,सापडा पथकातील सफौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील,पोकॉ प्रदिप पोळ,पोकॉ.राकेश दुसाने पो.कॉ,प्रणेश ठाकुर व कारवाई साठी मदतपोलीस निरीक्षक अमोल वालझाडे,पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव,पो.ह.रविंद्र घुगे,मपोहेकॉ.शैला धनगर,पो.ना.किशोर महाजन,पोना सुनिल वानखेडे,पोना.बाळू मराठे पोशी.अमोल सूर्यवंशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने ही मोठी कारवाई केल्याने पुन्हा जिल्ह्यातील लाचखोरांच्या मनात थडकी भरली आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!