एरंडोल चे आरोग्य सेवक उमेश महाजन यांचा संगमनेर येथे पुरस्कार देवून सन्मान
प्रतिनिधी- एरंडोल येथील समाजसेवक तथा जय बाबाजी फाऊंडेशन,नाशिक चे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण उमेश अभिमान महाजन हे मूळ एरंडोल चे असून ते सध्या नोकरी निमित्ताने नाशिक येथे वास्तव्यास आहेत. यांनी स्थापन केलेल्या फाऊंडेशन च्या माध्यमातून ते नेहमीच कॅन्सर, किडनी, व इतर मोठ्या आजारातून कुठलाही मोबदला न घेता व दवाखान्यात खर्च न देता योजनेच्या माध्यमातुन मोफत उपचार करून देत असतात महाजन यांची निस्वार्थी सेवा बघून संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ह्या फाऊंडेशन कडून शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार उमेश महाजन यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या हस्ते मानाची शाल, गौरव पत्र,व महाराजांची राजमुद्रा असलेल सन्मान चिन्ह देवून उमेश महाजन यांना गौरविण्यात आले.
या अगोदर देखील महाजन यांना समाज भूषण, उत्कृष्ट आरोग्य सेवक व इतर पुरस्कार देण्यात आले आहेत.
एरंडोल येथील सर्व समाज बांधवांनी व मित्र परिवार यांनी उमेश महाजन यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.