मंगळ ग्रह सेवा संस्थेला महाराष्ट्र शासनाचा समाज भूषण पुरस्कार प्रदान

IMG-20240314-WA0129.jpg

अमळनेर : धार्मिकेतसह समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन १२ मार्च रोजी सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील जमशेद भाभा नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, युवक व क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार संजय सावकारे, सचिव ओमप्रकाश बकोरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व सहसचिव दिलीप बहिरम यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
संस्थेतर्फे धार्मिकतेबरोबरच नाविण्यपूर्ण सामाजिक उपक्रम निरंतर राबविले जातात. त्यात दरवर्षी हजारो गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा, अंधश्रद्धा निर्मुलन, हुंडाबंदी, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्ती, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर विविधांगी कार्यशाळा, पर्यावरणपुरक उपक्रम आदी कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दखल घेत २५ हजार रोेख, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन मंगळ ग्रह सेवा संस्थेला भव्यदिव्य कार्यक्रमात सन्मानित केले. पुरस्कार मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व संपूर्ण विश्वस्त मंडळाचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!