बापरे कायदा माहित नाहीत पण अश्लील भाषेचा शब्दकोश तोंडी पाठ…
विशेष प्रतिनिधी जळगाव ता.जामनेर:– येथील वनविभागाच्या कार्यालयात दि.13 रोजी दुपारी 12.40 मिनिटांनी वृत्त संकलन साठी गेले असता कार्यालयातील लेखापाल सुनिल झांबरे व गोद्रीं वनपाल प्यारेलाल महाजन यांच्यात शासकिय वाहनांच्या बिलांबाबत वाद सुरू असताना “रां.. पण पैसा कमवितात” अश्या अश्लील भाषेचा वापर करीत असताना शासकीय कार्यालयात व शासकीय वेळेत आढळून आले.
सविस्तर वृत्त असे की महा इंडिया न्युजचे उपसंपादक चेतन तायडे,संपादक जयराज पवार,सह संपादक नितीन सुरवाडे,मुख्य संपादक अर्जुन आसने हे नागणचौकी येथील जेसीबीच्या साहाय्याने वनविभागाच्या हद्दीत अवैध प्रकारे कामे करून वन्यप्राणी त्रास देणे व वृक्षांची हाणी वनपाल प्रशांत भारूळे व वनरक्षक सुनिल चिंचोले करीत आहे या प्रकाराबाबत वृत्त संकलन करण्यासाठी गेले असता जामनेर वनविभाग कार्यालयातील लेखापाल सुनिल झांबरे व वनपाल प्यारेलाल महाजन यांच्यात शासकिय वाहनात वापरलेले पेट्रोल बिलांच्या आर्थिक व्यवहाराचा वाद सुरू असताना झांबरे यांच्या कडून “पैश्याकरता..रां.. हि पैसे कमवितात”असे अश्लील भाषेचा वापर वनपाल प्यारेलाल महाजन यांच्या करीता वापरले व नंतर प्यारेलाल महाजन यांनी सुध्दा “राव साहेब विषय वाढवू नका मला सुद्धा रां..रू..शब्द बोलता येताता” असे वाद करीत असताना शासकीय कार्यालयात,शासकीय वेळेत,व शासकीय पैश्यावरून वाद करतांना आढळून आले.
लेखापाल सुनिल झांबरे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4 (ख) 1 ते 17 प्रसिद्ध बाबतीत विचारलं असता मला कलम 4 (ख) काहीच माहिती नसल्याचा प्रकार समोर आला,शासनाकडून 4 ते 5 शासन परिपत्रकामध्ये वेळोवेळी कलम 4 (ख) 1 ते 17 बाबी प्रसिद्ध करण्यासाठी सुचनाही देण्यात आल्या,महत्त्वाचे म्हणजे नुकताच “रिट याचिका क्र.990/2021 प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4 (ख) च्या अंमलबजावणीबाबत” दि.4 मार्च 2024 रोजी कडक अंमलबजावणी साठी सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्रमांक.202403041624338207 या द्वारे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांना आदेश देण्यात आले आहे.
तरी मात्र हे कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियमातील कलम 4 (ख) माहिती नाही,मात्र अश्लील भाषेतील शब्दकोश हा तोंडीपाठ असल्याचे निदर्शनास आले आहे.