डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ॲड.ईश्वर बिऱ्हाडे यांची निवड.
प्रतिनिधी – एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती . सदर सभा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांच्या अध्यक्षस्थानी संपन्न झाली.
यावेळी सर्वानुमते ॲड.ईश्वर बिऱ्हाडे यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी,उपाध्यक्षपदी मोहन सैंदाने,विजय सोनवणे,कार्याध्यक्ष प्रकाश शिंदे,खजिनदार दिपक सोनवणे,सचिव संघरत्न गायकवाड व कार्यवाहक पदी अतुल सोनवणे,नितीन बोरसे,रविंद्र बोरसे,विशाल सोनवणे,संजय बेहरे,देवानंद निकम यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थिती आयु .प्रवीण केदार,प्रा.नरेंद्र गायकवाड,आयु.लखन बनसोडे,आबा सोनवणे,प्रेमराज गायकवाड,अतुल सोनवणे,संघरत्न गायकवाड,कैलास गायकवाड,पंकज बेहरे,विजय गव्हाणे,प्रकाश शिंदे,सागर बोरसे,नीतिन बोरसे व समाज बांधव उपस्थित होते.