खानदेश गौरव पुरस्काराने नुरुद्दीन मुल्लाजी सन्मानित
कासोदा (प्रतिनिधी) – येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना खानदेश गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
धरणगाव येथील महाविद्यालयात वर्ल्ड हुमानिटी कमिशन आणि दादासाहेब वाय. पी. निकम युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांना खान्देश गौरव पुरस्कार दादासाहेब वाय ,पी, निकम युवा फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ, यशवंत पाटील वर्ल्ड हुम्यानिटी कमिशनचे प्रमोद पाटील, धरणगाव महाविद्यालयाचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, संचालक मिलिंद डहाळे प्राचार्य, संजय शिंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा त्यांच्या ९२ वा पुरस्कार आहे
हा पुरस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रजा न्यूज चॅनलच्या संपादक प्रतीक जाधव ,हमारे देश की समस्या चैनल चे संपादक अब्दुल हक अन्सारी, दैनिक इन्कलाब अमळनेर प्रतिनिधी सत्तार खान, धरणगाव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एनुद्दीन सर , कासोदा येथील प्रमोद पाटील सर, मुजाहिद खान सर, आरिफ पेंटर, सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, जुल्फिकार अली, अब्दुल सत्तार अब्दुल मजीद आदी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.