एक दिवसीय सावित्री ज्योतिराव साहित्य संमेलनाचे एरंडोलला आयोजन….

IMG-20240328-WA0047.jpg

एरंडोल (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय साहित्य संघातर्फे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधत दिनांक 12 मे २०२४ रोजी एक दिवशीय राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्री ज्योतिराव मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे उद्‌गाते महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचे मंथन केले जाणार असून त्यांच्या विचारांची ज्योत महाराष्ट्रभर प्रज्वलित करण्याचा मानस राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक कवी प्रवीण आधार महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे व्यक्त केला आहे. या संमेलनात परिसंवाद, कथाकथन, नवोदित व ज्येष्ठांचे कवी संमेलन, तसेच शिक्षण क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणाऱ्यांचा थोर समाज सुधारक महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून हे संमेलन आगळे वेगळे ठरणार आहे. या संमेलनाच्या परिसराला एरंडोल येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा प्राचार्य स्व. यशवंत पाटील यांचे नाव देण्यात येणार असून जास्तीत जास्त साहित्यिक लेखकांनी या संमेलनात भाग घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक प्रवीण महाजन, संघाच्या तालुकाध्यक्ष कवयित्री मंगलाताई रोकडे‌ , ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वा. ना.आंधळे, प्रसिद्ध कादंबरीकार विलास मोरे, कवी निंबा बडगुजर, कवी भिमराव सोनवणे, पी जी चौधरी, रवी ठाकूर, कवयित्री मनीषा रघुवंशी यांनी केले असून तरी साहित्यिकांनी राष्ट्रीय साहित्य संघाच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई रोकडे यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. सदर संमेलन हे बस स्टँड जवळील श्री स्वामी समर्थ केंद्रात संपन्न होणार असून लवकरच संमेलन अध्यक्ष, उद्घाटक व मान्यवरांची निवड केली जाणार आहे. क्रांतीज्योती सावित्री ज्योतिराव मराठी साहित्य संमेलन हे राज्यातले पहिले वहिले संमेलन असून शाहू फुले आंबेडकर प्रेमींनी या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!