प्रियकराने फोटो प्रसारित. करण्याची  धमकी   देऊन केला विनयभंग……

images-5.jpeg

अमळनेर : प्रियकर व्यसनाधीन झाल्याने त्याला नकार दिला म्हणून तिला फोटो प्रसारित करण्याची  धमकी देऊन विनयभंग करणाऱ्या एरंडोल तालुक्यातील विखरण येथील प्रियकरावर अमळनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     दीपक कैलास महाजन रा विखरण ता एरंडोल हल्ली मुक्काम सावतावाडी माळीवाडा बहादरपूर रोड येथे राहतो. त्याचे प्रताप महाविद्यालयात एसवायबीए मध्ये शिकणाऱ्या एका तरुणीशी प्रेम संबन्ध होते. मात्र दीपक व्यसनाधीन असल्याचे समजल्यावर तरुणीने त्याच्याशी प्रेम सम्बध तोडले होते. दीपक ने ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता तरुणीचा पाठलाग करून प्रताप महाविद्यालयात हात पकडून तिला शिवीगाळ केली होती. व तिला मारण्यासाठी धावून आला. त्यांनंतर पुन्हा २५ मार्च रोजी दुपारी २ वाजता तिच्या घरासमोर जाऊन तिचा हात धरला व तुझे दुसऱ्याशी लग्न कसे होते ते पाहतो तू माझी झाली नाही तर दुसऱ्याची होऊ देणार नाही. तसेच माझ्या मोबाईल मध्ये तुझे फोटो आहेत ते ज्याठिकाणी तुझे लग्न होईल त्याठिकाणी  प्रसारित करेल अशीही धमकी दिली. म्हणून पीडित तरुणीने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग ,दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

About Author

You may have missed

error: Content is protected !!